पौड : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल,खतांची दरवाढीचा जाहीर निषेध मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असून मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर, भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील चांदेरे, उपसभापती विजय केदारी, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, भाऊ केदारी, सुहास दगडे, सरपंच लक्ष्मण कंधारे, बाळासाहेब झोरे,सागर धुमाळ, सतिश सुतार उपस्थित होते.
देशात महागाईने कळस गाठला असून पेट्रोल, डिझेल,खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. रोज नवनवीन भाव निर्माण होत असून सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. देशात वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असून मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याचा जाहिर निषेध करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे आणि सभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले.