पिरंगूट : बावधन बु येथील लसीकरण केंद्रावर स्थानिक ग्रामस्थांना प्रथम कोविड लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बावधन ग्रामस्थांनी तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनामध्ये, बावधन बु गावाचे शहरीकरण झालेले असून येथे मोठी रहिवाशी संख्या आहे. येथील लसीकरण केंद्रात स्थानिक रहिवाशी सोडून बाहेरील कोणीही लस घेण्यासाठी येत आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे लसीकरण झपाट्याने होण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी बावधन येथील लसीकरण केंद्रावर स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य देऊन कोविड लस प्रथम उपलब्ध करून दयावी व लस घेणाऱ्याची सबधित शासकिय चौकशी करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बावधनचे माजी सरपंच सुदामराव भुंडे,माजी सरपंच निलेश दगडे ,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश दगडे,उपसरपंच दिपक दगडे, माजी उपसरपंच वनराज दगडे, उद्योजक मनोज आप्पा दगडे, माजी उपसरपंच नंदकुमार दगडे, सामाजिक कार्यकर्ते सुहास दगडे, कैलास भुंडे, दलित पँथर अध्यक्ष विशाल खिलारे, ग्रामपंचायत सदस्य सचिन दगडे,कल्पना घुले, चंद्रकांत दगडे, तुषार दगडे उपस्थित होते.
ARTI CHANDAK
First dose is not given yet..m 54 yr old diabetik lady..