पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ कायदा सुव्यवस्था क्षेत्रात सतत १५ वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या वतीने विशेष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला होता. याबद्दल भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचा पौड येथे सत्कार केला आहे.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी गेली १५ वर्ष उत्तम सेवा बजावली आहे. तसेच पौड पोलिस स्टेशन हद्दीतही दोन वर्षात अनेक गंभीर गुन्ह्याची उकल करत काही नामचीन गुंडावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेत आमदार संग्राम थोपटे यांनी पौड येथील तहसिल कार्यालय येथे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचा सत्कार केला. यावेळी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, दादाराम मांडेकर, युवा नेते मधूर दाभाडे, संदीप केदारी,संदीप हुलावळे, राहूल जाधव, अमित जांभुळकर,कुमार शेडगे आदी उपस्थित होते.