पिरंगूट : सर्व सामान्य नागरिकांना मदत करून पुणे, मुंबई,नागपुर येथील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी लाॅकडाऊन केल्याने महाराष्ट्राचे नुकसान टळले आहे असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सुस ( ता.मुळशी ) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख व मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी सुरू केलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी दुरचित्रवाणी परिषद द्वारे(VC) मंञी आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार,शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे,पुणे शहर संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर,युवा सेना राज्य विस्तारक गणेश कवडे,जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,माजी सभापती रविंद्र, कंधारे,उपजिल्हा प्रमुख मोहोळ,युवासेना जिल्हा धिकारी अविनाश बलकवडे,शिवसहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भांडे,माजी विद्यार्थी सेना जिल्हा संघटक राम गायकवाड, माजी महिला जिल्हा संघटिका स्वाती ढमाले,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,माजी उपसभापती भानुदास पानसरे,युवासेना तालुका अधिकारी संतोष तोंडे,शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,तालुका संघटिका ज्योती चांदेरे,वाहतुक सेना तालुका अध्यक्ष शैलेश पांढरे,उपतालुका प्रमुख अनिल आधवडे,दिपक करंजावणे,संतोष बुचुडे,माऊली केमसे,विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,युवा सेना समन्वयक वैभव शितोळे,उपतालुका संघटिका कल्पना थोरशे सुसगावच्या सरपंच अपुर्वा निकाळजे,म्हाळुंगे गावचे सरपंच मयुर भांडे,माजी सरपंच नारायण चांदेरे,जामगावचे माजी सरपंच हनुमंत सुर्वे, सुसगावचे उपसरपंच दिशा ससार,सचिन चांदेरे,मा.उपसरपंच गणेश साळुंके, गजानन चांदेरे,अनिकेत चांदेरे,बाळासाहेब निकाळजे, शुभांगी ससार,दिपाली पारखी,सिमा निकाळजे,माजी सरपंच मिरा देवकर,निम्हण असोशिएट व आयरिस लाॅन्सचे प्रोपा.जयप्रकाश निम्हण,गणेश निम्हण,सामाजिक कार्यकर्ते उत्तम ससार,सोमनाथ कोळेकर,बाळासाहेब भोते,मा.चेअरमन दत्तात्रय चांदेरे, सोपान चांदेरे,व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई पदाधिकारी यांच्या पाठोपाठ पुणे शिवसेना पदाधिकारी संजय मोरे,बाळासाहेब चांदेरे यांचे कौतुक करून पंतप्रधानांनी उध्दवजी ठाकरे यांच्या केलेल्या कौतुकाला सर्व सामान्य शिवसैनिक पात्र असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार निलम गो-हे यांनी त्यांच्या फंडातुन ५० हजार रुपये फंड जाहीर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केले व आभार सुसगावच्या सरपंच अपुर्वा निकाळजे यांनी मानले.
कोविड केअर सेंटर साठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निम्हण असोशिएट व आयरिस लाॅन्सचे प्रोपायटर जयप्रकाश निम्हण व गणेश निम्हण यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी कोविड केअर सेंटरसाठी एक लाख रुपये रोख स्वरूपात देणगी दिली.सुसगावच्या विद्यमान उपसरपंच दिशा ससार यांनीही एक लाख रुपये चेक स्वरूपात देणगी दिली.