logo
add image
add image
Blog single photo

उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या सूचननेनुसार पौड ग्रामीण रूग्णालयात होणार आँक्सिजन प्रकल्प


पौड : पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आँक्सिजनचा प्रकल्प ( medical Grade oxygen Concentrator system ) उभारण्यासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झाला असून याला जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली.यामुळे आँक्सिजन वाचून कोरोना रूग्णांचे होणारे हाल कमी होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिली आहे.

       पौड येथील ग्रामिण रूग्णालयात नुकतेच ३० बेडचे कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दहा पेक्षा जास्त कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. देशात अनेक ठिकाणी रूग्णालयात आँक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रूग्णालयात आँक्सिजन वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक कोरोना रूग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे.

        याच धर्तीवर पौड येथील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात मुबलक जागा उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी १५ आँक्सिजन सिलेंडर देखील आहेत. माञ रूग्णांच्या जीवाशी खेळ नको म्हणून या आँक्सिजनचा प्रकल्प ( medical Grade oxygen Concentrator system ) उभारण्यात येणार आहे. याठिकाणी आँक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी पौड ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक धनराज परदेशी यांनी मागणी केली होती.

जिल्ह्यात आठ ठिकाणी प्रकल्प 

 पुणे जिल्ह्यात कोविड १९ बाधित रूग्णांकरीता जिल्ह्यातील आठ आरोग्य संस्थेतील रूग्णांना आँक्सिजन पुरवठा करण्याकरीता ( medical Grade oxygen Concentrator system ) हा प्रकल्प उभारण्यात येणार असून या करीता एकूण चार कोटी अकरा लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

कोविड १९ या आजारावर उपाय योजना करीता पौड येथील आँक्सिजन प्रकल्पाला जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख यांनी मंजूरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिली.

add image
add image

Leave Comments

Top