logo
add image
add image
Blog single photo

जामगांव - दिसली ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांची कोरोना चाचणी


मुळशी : ग्रामपंचायत जामगांव - दिसली येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती मुळशी व गृप ग्रामपंचायत जामगांव यांच्या मार्फत नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ९ जण कोरोनाबाधित आढळून आले.

        कोरोना चाचणी या झालेल्या  शिबिरात १७० ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये ९ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. या कोरोना बाधित रूग्णांना आरोग्य सेविका अंजली ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासंदर्भात सुचना देण्यात आल्या.

       या वेळी सरपंच अलका ढाकुळ, उपसरपंच विनोद सुर्वे ,ग्रामपंचायत सदस्य योगेश ठोबरे ,ग्रामपंचायत कर्मचारी राहुल ढाकुळ व गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामसेवक बोराटे भाऊसाहेब, कोविड सेंटरचे तायडे, आरती सुतार यांनी रूग्ण तपासणीसाठी मदत केली.

add image
add image

Leave Comments

Top