logo
add image
add image
Blog single photo

अखेर सरपंच - उपसरपंच निवडीची तारीख ठरली


मुळशी : - मुळशी तालुक्यात ४५ ग्रामपंचायतसाठी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी हि तारीख अंतिम करण्यात आलेली असून सरपंच पदासाठी इच्छूक असणाऱ्याचा अखेर जीव भांड्यात पडला आहे. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक आणि सरपंच व उपसरपंच निवड करण्यात यावी असा आदेश जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्ह्यातील तहसिलदार  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. 

         मुळशी तालुक्यातील ४५ पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. याची मतमोजणी १८ जानेवारी रोजी झालेली होती तर ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये ९ फेब्रुवारी भोईणी, रिहे, शेरे, मुठा, भुकूम, चांदे, नानेगांव, मुलखेड,. जांबे, काशिग, घोटावडे, कासारआंबोली, पौड, अंबडवेट, मारूंजी, कासारसाई, हिंजवडी, नांदे, माण, लवळे, उरवडे, चिंचवड, वाळेण या २३ तर १० फेब्रुवारीला बोतरवाडी, खांबोली, मांदेडे, आंदेशे, हाडशी, भरे,चाले, आंदगांव, कोळावडे, नेरे, भालगुडी, कातरखडक, नांदगांव, साठेसाई, कुळे, मुगावडे, दखणे, चिखलगांव, खेचरे, अकोले, कोळवण,आंबेगांव २२ ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच  निवड होणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top