logo
add image
add image
Blog single photo

शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने पौड येथे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन


पौड : शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र दिन तसेच शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवार ( दि. १ मे ) रोजी पौड येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मामासाहेब मोहोळ सभाग्रह येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची प्रमुख उपस्थित या कार्यक्रमाला असणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी दिली आहे.

     सध्या राज्यातील रक्ताची कमतरता लक्षात घेता भव्य रक्तदान शिबिर,प्लाझ्मा दान शिबिर,हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असुन तालुक्यातील नागरिक,शिवसैनिक,पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सचिन खैरे यांनी केले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षाचा मोफत अपघाती विमा, मास्क व सँनिटायझर देण्यात येणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top