logo
add image
add image
Blog single photo

पौड येथे रक्तदान शिबीरात २५ जणांचे रक्तदान


पौड : पौडगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  

     या शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश ठोंबरे, पौडचे माजी सरपंच संपत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पौड - आंबवणे गण अध्यक्ष नवनाथ चिंधू लांडगे, पोलिस पाटील संजय पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते संकेत दळवी, सुरज पिंगळे,सागर लांडगे, आशुतोष पिंगळे,ओंकार उबाळे भास्कर राऊत,सोन्या लांडगे आदी उपस्थित होते.रक्तसंकलनाचे काम पिंपरी चिंचवड रक्तपेढीने केले.                 

      कोरोनाच्या महामारीच्या काळात गाव पातळीवर आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरारास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक जण सध्या लस घेत असून लस घेण्याच्या अगोदर रक्तदान करावे म्हणजे गरजूंना रक्ताचा तुटवडा भासणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पौड आंबवणे युवक अध्यक्ष नवनाथ चिंधू लांडगे यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top