logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोली येथे १७५ आयुर्वेदीक काढा किटचे वाटप


पिरंगूट : कासारआंबोली ( ता.मुळशी ) येथील ग्रामदैवत पद्मावती देवी उत्सवानिमित्त कासारआंबोली येथे ग्रामपंचायत कासारआंबोली व अनुभूती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक काढ्यांचे १७५ किट चे वाटप करण्यात आले. हे किटचे वाटप संस्था कोरोना काळ संपेपर्यंत करणार आहेत.

      यावेळी कासारआंबोली गावचे सरपंच सचिन धुमाळ, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सूनिलशेठ वाडकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामभाऊ गायकवाड,उपसरपंच स्वप्निल शिंदे, मा. चेअरमन मारूती शिंदे, मा. चेअरमन जयसिंग गायकवाड, माजी सरपंच गणेश सुतार माजी उपसरपंच शेखर शिंदे, माउली धुमाळ, अनुभूती सोशल फाऊंडेशनचे चेअरमन प्रशांत कोल्हे,  माउली धुमाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सागर धुमाळ, सुनिल शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रताप माने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top