logo
add image
add image
Blog single photo

पौडमध्ये ३५ आँक्सिजन बेडच्या कोविड रूग्णालयाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते उदघाटन


पौड : पौड येथील ग्रामीण रूग्णालयात ३५ बेडचे कोविड रूग्णालयाचे उदघाटन  आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.या सर्व बेडवरील रूग्णांना आँक्सिजन उपलब्ध होणार असल्याने मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णांची होणारी फरफट यामुळे कमी होणार आहे.

       यावेळी मावळ मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर,पौड ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक धनराज परदेशी, उपअधिक्षक अशोक शेडगे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, युवा नेते मधुर दाभाडे, पौडचे सरपंच जगदीश लांडगे, राहूल जाधव,अविनाश शिंदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, डाँ. प्रज्ञा संघवी, डाँ. प्राची उत्तरवार, डाँ.पूनम चव्हाण, डाँ.धुमाळ उपस्थित होते.

          आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, पौड ग्रामीण रूग्णालयात ३५ बेडचे आँक्सिजन रहित कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी २५ आँक्सिजन सिंलेडर आमदार फंडातून लवकरच देण्यात येतील. या ठिकाणी मेडिकल आँफिसर व नर्सची सोय करण्यात येणार आहे.

    

add image
add image

Leave Comments

Top