पिरंगूट : मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिरंगूट येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २५७ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उदघाटन मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे,भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील चांदेरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दगडु काका करंजावणे, नामदेव आण्णा माझिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश पाडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष दिपाली कोकरे,सरपंच शिल्पा पोकळे, भाऊ केदारी,पिरंगूटचे सरपंच चांगदेव पवळे,पोलिस पाटील प्रकाश पवळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास अमराळे, शिवराय प्रतिष्ठानचे संतोष पवळे,भोर विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सागर धुमाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र इंगवले,पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडिया सरचिटणीस सतिश सुतार,राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनाथ चरवड, शेकापचे तालुका अध्यक्ष मोहन गोळे, मुळशी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव ,माजी उपसरपंच महादेव आण्णा गोळे,पिरंगूट ग्रामपंचायत सदस्य राहूल पवळे,पिरंगूट ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ,कासारआंबोली ग्रामपंचायत सदस्य रणजित गायकवाड, दत्ता ढमाले, गणेश पवळे हे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असून रक्तचा तुटवडा सर्वञ जाणवत आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २५७ जणांनी रक्तदान केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी यावेळी सपत्नीक रक्तदान केले तर पिरंगूट येथील शिवराय प्रतिष्ठानचे संतोष पवळे यांनी आजसह ३० वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास यावेळी हेल्मेट भेट देण्यात आले. रक्त संकलनासाठी पुणे सर्जिकल ब्लड बॅंकेने सहकार्य केले.