भुगांव : जागतिक संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केलेल्या कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भुगांव येथील जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकशे एक जणांनी रक्तदान केले.
कोरोनाचा जागतिक कहर झाल्यानंतर सर्वञ मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. या लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शासन स्तरावर होत आहेत, त्यास जनतेची साथ मिळत आहे. या लढ्यासाठी अनेक कोरोना वॉरियर्स काम करत आहेत .
जाणता राजा प्रतिष्ठाण शिवजयंती निमित्त रयत विद्यार्थी परिषदेचे सामाजिक काम पाहून रयत विद्यार्थी परिषदेचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती देऊन सन्मानित केले.त्याचबरोबरीने कोरोना वॉरियर्स म्हणून काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान केला व भव्य रक्तदान शिबिरात सिंम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रेअसरच सेंटर सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन अमित सणस यांनी केले होते. पुढेही जाणता राजा प्रतिष्ठाण च्या वतीने समाजपयोगी कामे करत राहू असे अमित सणस यांनी सांगितले.यावेळी बाळासाहेब सणस, युवराज राठोड,विजय सणस, सचिन म्हसूडगे, ऋषी वाघमारे अथर्व केमसे,दीपक दळवी,समर्थ बोडके, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, ओमकार भोईर, अजय चव्हाण उपस्थित होते.