logo
add image
add image
Blog single photo

भुकूम येथे बैलगाडा शर्यतीवर पौड पोलिसांची कारवाई


पिरंगूट : भुकूम येथील आंग्रेवाडीच्या मोकळ्या पटांगणावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पौड पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे. बैलांना निर्दयपणे वागून शर्यतीचे आयोजन केले असले बाबत पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून गुन्हा दाखल करण्याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस काँन्सटेबल तुषार भोईटे, पोलीस हवालदार सुनिल मगर, पोलीस नाईक नितीन गार्डी यांना सांगितले

       याप्रकरणी १) योगेश निवृत्ती साठे  ( वय २८, वर्ष राहणार भोईरवाडी माण  २)ऋतिक काळूराम ठाकर वय २१ वर्ष  ३) दीपक राजेंद्र मारणे वय २१वर्ष राहणार उरवडे  ४) राजेंद्र बाळू मारणे वय ५० वर्षे राहणार उरवडे ५) अक्षय लांडगे राहणार कासार आंबोली  ६) संजय दामू गोडांबे राहणार घोटावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       माननीय जिल्हाधिकारी यांनी  कोरोना-19 बाबत प्रसारीत केलेले आदेश - निदेश यांचे पालन न करता लोकांची गर्दी जमून, सोशल डिस्टंसिंग न पाळता तसेच लोकांच्या आरोग्याची काळजी न घेता त्यांचे आरोग्य धोक्यात येईल अशी कृती यांनी केली आहे.  पौड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशाप्रकारे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यास त्याची माहिती पौड पोलीस स्टेशन येथे देण्याबाबत पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आवाहन केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top