logo
add image
add image
Blog single photo

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारास अटक


मुळशी : गुन्हेगार मंगेश नामदेव पालवे यास साथीदार व ४ गावठी पिस्तोल सह स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे कडुन जेरबंद करण्यात आले आहे. पेालीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिग करीत असताना घोटावडे गावचे हद्दीत हनुमान मंदिर चैक ते बापुजीबुवा मंदिर कडे जाणारे  रोडवर बापुजीबुवाभा.द.वि.क.307,452,324,504 म.पो.का. कलम 37(1),(3),135 या गुन्हयातील निष्पन्न व  पाहिजे असलेला आरोपी मंगेश नामदेव पालवे ( रा- रिहे ता - मुळशी ) हा त्याचे जवळ असणारे पिस्तोलची विक्री करणार असून ते घेण्याकरीता ५ इसम आले असून त्यांचेत पिस्तोलची खरेदी व विक्री चालू आहे ’’ अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) मंगेश नामदेव पालवे वय (30 रा. रिहे, मोरेवाडी ता. मुळशी जि. पुणे)  2) अरविंद महादेव गाडे (वय 26 रा. एक्कुरगा ता. लातूर जि. लातुर) ,3) रामदास भिमराव ओझरकर (वय 35 रा. ओझर्डे ता. मावळ,) तसेच विदयाधर निचीत व त्यांचे सोबत असलेल्या स्टाफने पकडलेल्या इसमांनी त्यांची नांवे  4) गौरव शंकर लोंढे (वय 32 रा. यषवंतनगर, भक्ती शोभा, तळेगाव दाभाडे ता. मावळ ) , 5) बाळा श्रीमंत आढळे (वय 27 रा. कल्पना सोसायटी जवळ शीव काॅलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ ), 6) ज्ञानेष्वर नागुराव काळे (वय 28 रा. बोरगाव काळे ता. लातुर जि. लातुर ).हे मिळुन आले. त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत सदर इसमांपैकी मंगेश नामदेव पालवे, अरविंद महादेव गाडे,रामदास भिमराव ओझरकर, गौरव शंकर लोंढे याचे कडे प्रत्येकी १ पिस्तोल तसेच जिवंत काडतुस व मोबाईल फोन असा एकुण २,५६,३०० चा माल मिळुन आला आहे. 

सदर आरेापीना पुढील कारवाई कामी पौड पोलीस स्टेशनचे ताब्यात देणेत आले आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, रामेश्वर धोंडगे, पोलीस उप निरीक्षक, दत्तात्रय जगताप, सहा.पोलीस उप निरीक्षक, दिलीप जाधवर, सहा. पोलीस उपनिरीक्षक, शब्बीर पठाण, सहा.पोलीस उप निरीक्षक, पो.काॅ अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, पो.हवा विदयाधर निचित, प्रकाश वाघमारे , सुनिल जावळे, दत्तात्रय तांबे, सागर चंद्रशेखर या पथकाने केली

add image
add image

Leave Comments

Top