logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार पुन्हा कारवाई. काल दिवसभरात ३५ जणांवर कारवाई


पिरंगूट : मुळशी तालुक्यात फिरताना पुन्हा मास्क बंधणकारक झाला असून मास्क न घातलेल्या ३५ जणांवर काल घोटावडे फाटा परिसरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

       गेल्या काही महिन्यात कमी झालेल्या कोरोना रूग्णाची संख्या परत  वाढायला लागली आहे. सर्वञ सध्या कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्याचे आरोग्य मंञी यांनी वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येची गंभीर दखल घेतली असून मास्क न घालणाऱ्यावर पुन्हा कारवाई करण्यात यावेत असे आदेश दिले आहे. या आदेशाची आता सर्वत्र अमंलबजावणी करण्यास सुरूवात झाली असून मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे काल ( दि.१६) रोजी ३५ विनामास्क फिरणाय्रावर कारवाई करण्यात आली. हि कारवाई वाहतूक पोलिस तुषार भोईटे, प्रशांत शिंदे व इतर जणांनी केली.

    कोरोनाची संख्या मुळशी तालुक्यात   काही दिवस कमी होती. परंतु सध्या संख्या वाढू लागल्याने सर्व नागरिकांना  पुन्हा मास्क बंधनकारक करण्यात आला असून विनामास्क फिरणाय्रावर कारवाई करण्यात येईल असे पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top