पौड : भांडणे सोडवायला गेलेल्यास शिवीगाळ करून मारहाण करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. किरण सुरेश माकर (वय २७ रा.घोटावडे लांडगेवाडी ता.मुळशी जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रजत प्रकाश भोसले यांनी फिर्याद दिली होती.
दि १/०२/२०२१ रोजी रिहे (ता. मुळशी) येथे आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून त्याचे भाऊ मनोज प्रकाश भोसले यास शिवीगाळ करून तुझा भाऊ लय मोठा डॉन झाला काय,आम्हाला नडतो ,शिव्या देतो म्हणून त्यास मारहाण केली. फिर्यादी भांडणे सोडवण्यास गेले असता त्याचा डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावरून पौड पोलीस स्टे येथे गु. र.नं ३०/ २०२१ भा.द.वी ३०७,४५२,३२४,५०४ महा पोलीस कायदा कलम ३७(१)३,१३५* नुसार गुन्हा दाखल झाला होता .सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असलेमुळे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. दरम्यान सदर गुन्हयातील आरोपी हा हनुमान चौक घोटावडे येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून पौड पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याचेविरुद्ध यापूर्वी पौड पोस्ट गुरंन (1)263/2015 कलम326, 323, 341,143,147, 148, 149, 504, 506 (2)180/2018 कलम 302, 34 (3)385/2020 कलम 354 असे 03 गुन्हे दाखल असून गुरन 385/2020 कलम 354 मध्ये तो पाहिजे/फरार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार, दिलीप जाधवर, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोकॉ बाळासाहेब खडके यांनी केली आहे.