logo
add image
add image
Blog single photo

भुगावमधील छञपती शिवाजी महाराज जलाशयात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू


मुळशी : भुगांव - भुकूम ( ता.मुळशी ) सीमेवर असणाऱ्या छञपती शिवाजी महाराज जलाशयात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. या मयताची अद्यापही ओळख पटलेली नाही
      मृतदेह सडलेला असून मृताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष आहे. मृताच्या अंगात फिकट आकाशी रंगाचा शर्ट असून त्यावर गँलक्सी सिक्युरिटी असे नाव लिहीलेले आहे. तसेच त्यांच्या अंगावर काळ्या रंगाची पँन्ट घातलेली आहे. यावेळी बिट अमलदार अनिता रवळेकर, पोलिस हवालदार सुनिल मगर उपस्थित होते. मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमोद बलकवडे यांच्या टिमने मृतदेह बाहेर काढला. सदर अनोळखी इसमा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास पौड पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे यावेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top