logo
add image
add image
Blog single photo

पौड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाची गैरसोय


पौड : पौड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची मोठी गैरसोय होत आहे. दुपारी दोन वाजता शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाचे रात्री नऊ वाजले तरी शवविच्छेदन झाले नव्हते. विविध कारणे देत येथील डाँक्टरांनी राञी नऊ वाजेपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन केलेले नव्हते. अखेर हा मृतदेह राञी नऊ वाजता शवविच्छेदन करण्यासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला. यामुळे संबंधितांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

      आज सकाळी मुळशी खुर्द येथे चिंचवड येथील मोहननगरचे शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख विजय सुर्वे यांचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला होता. अकराच्या दरम्यान घटनास्थळावर पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह पौड पोलिस दाखल झाले होते. पंचनामा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता विजय सुर्वे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.

       मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी माणूस उपस्थित नाही असे कारण देत शवविच्छेदन केले नाही. नंतर माणूस उपस्थित झाल्यावर हत्याराचे कारण दिले. हत्यारही उपलब्ध झाल्यानंतर तज्ञ डाँक्टर उपस्थित नाही तरी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे घेऊन जा असे उपस्थित डाँक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. मृतदेह पौड ग्रामीण आरोग्य केँद्रात आल्यानंतर आठ तासानंतरही त्याचे शवविच्छेदन झाले नसल्याने मृताचे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.अखेर राञी नऊ वाजता हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला.

add image
add image

Leave Comments

Top