logo
add image
add image
Blog single photo

मुळशी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला.


मुळशी : मुळशी खुर्द ( ता.मुळशी ) येथे हाँटेल दिशाजच्या जवळ आज सकाळी एक मृतदेह गावकऱ्यांना मिळून आला होता. हा मृतदेह चिंचवड येथील मोहननगरचे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

       सकाळी कामावर जाणाऱ्या येथील नागरिकांना प्रथम दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. माञ हि पडलेली व्यक्ती पालथी पडलेली असून अंगातून रक्तस्त्राव येत होता. असे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली.

       पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलिस हवालदार शंकर नवले, बीट अमंलदार सचिन शिंदे, ठाणे अंमलदार अनिता रावळेकर, पोलिस नाईक चंद्रशेखर हगवणे, पोलिस पाटील आकाश कांबळे, या पोलिस पथकाने घटना स्थळावर धाव घेतली. मृतदेहाची तसेच मृतदेह पडलेल्या परिसराची पाहणी केली असता या मयताचे नाव विजय सर्जेराव सुर्वे( वय.४०, रा. चिंचवड ) असे तपासात निष्पन्न झाले आहे.

add image
add image

Leave Comments

Top