logo
add image
add image
Blog single photo

मुळशी पॅटर्नचा पुन्हा थरार वाळेणमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यु



पौड: वाळेण(ता. मुळशी) येथे भांडणातुन गोळीबार झाला असुन एकाचा मृत्यु झाला आहे. 

या प्रकरणी सुमारे सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान अजय राघु साठे(वय ४०, रा. वाळेण) हा म्हशींना पाणी पाजण्यासाठी म्हशी घेऊन वाळेण येथील ओढ्यावर चालला होता. येेथे नविन पुलाचे काम चालु असुन तेथे अजय व बापु लक्ष्मण जोरी(वय २४, रा. डोंगरगाव) यांची वादावादी झाली. दरम्यान राग सहन न झाल्याने अजय याने बापुच्या कानशीलात मारली. हा राग बापुला सहन न झाल्याने त्याने घरी जाऊन घरातील बंदुक आणुन अजय यांच्या छातीच्या डाव्या बाजुला गोळी झाडली. यांत अजय जखमी झाला होता, त्याला पुढील उपचारासाठी हलविले असता रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड येथील रुग्नालयात आणला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपिला पौड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळता हवेलीच्या उपविभागिय पोलिस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक भालचंद्र शिंदे, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, सिद्धेश पाटील, पोलिस पाटील विवेक ढमाले यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पुढील तपास पौड पोलिस करीत आहे. 


add image
add image

Leave Comments

Top