logo
add image
add image
Blog single photo

पिरंगुट येथील बत्तीस वर्षीय तरुणाचा अपहरण करून खून


पिरंगुट : आईला वाईट हेतूने खुनविल्याचा संशय मनात ठेवून कासारआंबोली येथून अपहरण केलेल्या बत्तीस वर्षीय तरूणाचा कासारआंबोली येथील म्हसोबाची खाण येथे कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वेल्हे पोलिस स्टेशन हद्दीतील अति दूर्गम असलेल्या घोल येथून गारजाईवाडी कडे जाणाऱ्या रोडखालील सिमेंटच्या पाईपमध्ये घालून पेटवून देण्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पौड पोलिसांच्या पथकाने चार आरोपींना अटक अवघ्या दोन तासात अटक केली आहे.

      पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल काशिनाथ इंगवले ( वय. ३२ वर्ष, रा. पिरंगुट ) याचे चौघा जणांनी बुधवार ( दि.२४ ) रोजी मारहाण करून त्याला गाडीत घालून नेल्याची फिर्याद राहूल याच्या कुटुंबातील व्यक्तीने पौड पोलिसांकडे दिली होती.फिर्यादीत असलेल्या आरोपीना फिर्याद दाखल झाल्यानंतर पौड पोलिसांनी  दोन तासात अटक करून ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माञ त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी सत्य घटना पोलिसांना सांगितली.

      मयत राहूल हा आरोपीच्या आईला खूनवतो हा संशय मनात ठेवून आकाश केदारी,शेखर केदारी, विक्रम जगताप ( तिघेही रा.पिरंगूट ), प्रमोद कांबळे ( रा.कासारआंबोली ) यांनी राहूल याला कासारआंबोली येथून गाडीत घालून कासारआंबोली येथील म्हसोबाची खाण येथे नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वेल्हे पोलिस स्टेशन हद्दीतील अति दूर्गम असलेल्या घोल येथून गारजाईवाडी कडे जाणाऱ्या रोडखालील सिमेंटच्या पाईपमध्ये मृतदेह घालून पेटवून दिला. याबाबत वेल्हे पोलिस स्टेशन अज्ञात मृतदेह सापडल्याची नोंद झाली. याबाबत पौड पोलिस स्टेशन हद्दीतील अपहरण झालेला तरूणाचे वर्णन मिळते जुळते झाले. 

        सदर कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डाँ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.सई भोरे पाटील,पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, सचिन शिंदे, पोलिस हवालदार शंकर नवले, नितीन रावते, सादिक इनामदार,पोलिस नाईक जय पवार,रविंद्र नागटिळक,सुहास देवकाते,पोलिस काँन्स्टेबल अनिकेत सोनवणे,तुषार भोईटे, सिध्देश पाटील यांच्या पथकाने केली आहे.

add image
add image
  • Blog single photo
    2021-03-02 09:52:03

    राजु कोंढाळकर

    खुप खुप आभारी आहे. खुप छान बातम्या आहेत एक चांगल पाऊल ज्यामुळे सर्व काही माहिती मिळते Best Of Luck ....

Leave Comments

Top