logo
add image
add image
Blog single photo

लवळे फाटा येथे एटीएममधून रोख रक्कम चोरीला


पौड : मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएममधून अकरा लाख रूपयांची चोरी होण्याची घटना घडली आहे.या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रविण चिमणदास बुटाला यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, चौथा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँक बंद असल्याने शुक्रवारी ( दि.२२) सायंकाळी चार वाजता अकरा लाख रूपये कँश एटीएममध्ये भरण्यात आली होती. माञ सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तीनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून आतील कँश पिशवीत भरून घेऊन गेले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.आज सोमवार ( दि.२५ ) रोजी एटीएममधून कँश येत निघत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.सदर घटनेचा तपास पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.

add image
add image

Leave Comments

Top