logo
add image
add image
Blog single photo

टेमघरला जनावरांच्या व्यापारातील वादातून झालेल्या मारहाणीत तैलबैल येथील जनावरांच्या व्यापाऱ्याचा खून


पौड : टेमघर (ता.मुळशी) येथील मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून नारायण जनू गोरे (वय ४२  , रा. तैलबैल , ता.मुळशी) असे मयत इसमाचे नाव असून काल सोमवार दिनांक १३ रोजी  रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेतील चारही संशयित आरोपींना पौड पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण रामा मरगळे , शंकर लक्ष्मण मरगळे , सुनील धोंडिबा मरगळे व किसन धोंडिबा मरगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

           पौड पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार , फिर्यादी  व मयत नारायण गोरे हे जनावरांचे व्यापारी आहेत. त्यांनी  टेमघर येथील मुऱ्हा खरब परिसरातील एका शेतकऱ्याचे बैल खरेदी करून घेऊन चालले होते. दरम्यान ही गोष्ट आरोपींच्या कानावर गेल्यावर त्यांनी कांगुरमाळ येथून मोटर सायकलवरून जात असलेल्या मयत गोरे व फिर्यादी या दोघांना कांगूरमाळ येथील कांगुरबाबा मंदिराच्या परिसरात अडविले व ' जनावरे खरेदी करायला तुम्ही  आमच्या भागात का आलात?   ' याचा जाब विचारला व त्यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.  आरोपींनी  दमदाटी करून फिर्यादी ला जिवे ठार मारण्याच्या  उद्देशाने लाकडी दांडक्याने पाठीवर, पायावर उजवे हातावर मारहाण करून फिर्यादी चे मोटार सायकल तोडून नुकसान केले आहे. तर फिर्यादीचा मयत मित्र नारायण जनू गोरे  यास लाकडी दाडक्याने डोक्यावर, पायावर, हातावर, पाठीवर छातीवर मारहाण करून त्यास जिवे ठार मारले आहे. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर पुढील तपास करत आहेत. 

add image
add image

Leave Comments

Top