पौड : पळसे ( ता.मुळशी ) येथील आत्मथंन रिसोर्टमधून चोरीला गेलेल्या सहा हजार अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला पौड पोलिसांनी १० दिवसांत गजाआड करून न्यायालयीन प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करून अमेरिकन महिलेला रक्कम देण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. भालचंद्र श्रीधर जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.
पळसे येथील आत्मथंन आलेले गेस्ट बीबी जमीना करीम ( रा ,अमेरिका न्यूयॉर्क गयाना सिटी) यांचे युएस डॉलर चोरीला गेल्याचे फिर्याद पौड पोलिस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी घटनास्थळाला भेट देवून घटनेचा तपास करण्याच्या सुचना दिल्या. याप्रकरणी विजय पटोई ( रा. मुंबई टीटवाला ) ह्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केलीची कबुली दिली.आरोपी विजय पटोई ह्याच्या कडून ५९४३ यूएस डाँलर हस्तगत करण्यात आले
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी शिवाजीनागर कोर्ट नं ७ यांनी बीबी जमीना करीम यांना सदरचे डॉलर परत देण्याचे आदेश दिले असुन त्याना त्यांचे यूएस डॉलर परत करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे ,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार ,पोलीस हवालदार रॉकी देवकाते,पोलीस नाईक नामदेव मोरे,दत्तात्रय अर्जुन,पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख,आकाश पाटील,अक्षय यादव यांनी केली.