पौड : पहिला प्रेम विवाह झालेला असतानाही दुसरी बरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत अटक केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे फाटा ( ता.मुळशी ) येथे एका आय.सी.यु.वाँर्ड मध्ये ब्रदर्स (परिचारक) म्हणून काम करणारा स्वप्निल विभिषण सावत ( वय २३ वर्ष रा. सांगवी ता. आष्टी जि.बीड ) याचे प्रियांका क्षेत्रे ( वय २२ वर्ष ) हिच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. ५ महिन्या पुर्वी कासार आंबोली येथे भाड्याने खोली घेऊन ते दोघेही राहायला आले होते. दरम्यानच्या काळात स्वप्नील याचे परिचारीका असलेल्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले व तिच्या सोबत दुसरे लग्न करण्याचे स्वप्न तो पाहू लागला. परंतु पहिले लग्न प्रियांका क्षेत्रे हिचे सोबत झालेने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. त्यामुळे त्याने पत्नी प्रियांका क्षेत्रे हिला राहत्या घरी ठार मारून घोटावडे फाटा येथिल एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा खोटा प्रयत्न केला.तेथील डाँक्टरांनी पौड पोलिसांना कळवून अकस्मात मयताची खबर दिली.प्रियांका हिच्या घरच्यांनी स्वप्निल सावंत याच्या विरूद्ध मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गून्हा दाखल केला होता.
पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत स्वप्निल विभिषण सावंत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिचा खून केला असल्याचे तपासात उघड झाले. आरोपी स्वप्निल सांवत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिला जिवे ठार मारण्यासाठी तो काम करीत असलेल्या खाजगी हॉस्पिटल आय.सी.यु.मधुन गपचुप घातक औषधे घरी नेऊन मयत पत्नी प्रियांका सावंत हिला घरामध्ये दिली.मयताचा बीपी कमी होण्यासाठी तसेच शुगर कमी होण्यासाठी असलेले दोन इंजेक्शन तसेच इतरही काही इंजक्शन अधूनमधून प्रियांकाला देत तिचा स्वप्नील याने खून केला.
सदर खुनाचा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल , अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेबे ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलिस हवालादार आनंदा बाठे,संदिप सकपाळ पोहवा, दिपक पालखे, पोलीस नाईक सिध्देश पाटील, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, गणेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांनी सखोल तपास करून गुन्हा उघडकीस केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे करीत आहेत.