logo
add image
add image
Blog single photo

प्लसव्हँली येथील कुंडात पडून तरूणाचा मृत्यू


मुळशी  : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर मुळशी तालुक्यात असलेल्या प्लसव्हँली येथील खोल पाण्याच्या कुंडात पडलेल्या तरूणाचा मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीला यश आले आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, अजित मोतिलाल कश्यप ( वय २३ सध्या राहणार खराडी, मुळगाव दिल्ली )  हा अभिजीत रोहीला, आलोक रावत, प्रभाकर पवार, ओंकार साधले या मिञासमवेत मुळशी तालूक्यातील डोंगरवाडी येथील प्लस व्हँली येथे ट्रेक करण्यासाठी आला होता.प्लस व्हँलीत पुणे रायगड हद्दीवर मोठे तीन कुंड असून त्यातील एक नंबर कुंडात अजितचे दोन साथिदार पोहण्यासाठी उतरले. अजित कपडे काढून कुंडात उतरत असताना तोल न सावरल्याने खडकावरून घसरत खाली पडला. पाण्यात असलेल्या दगडावर पडल्याने डोक्याला आणि तोंडावर मार लागल्याने घाबरत हात पाय मारू लागला.तेव्हा जवळच असलेल्या पर्यटकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत अजित पाण्याखाली गेला होता.

        मिञांनी मदतीसाठी आरडाओरडा केला व मोबाईलला रेंज शोधत ११२ वरती फोनकरून मदत मागितली. त्याच वेळी अजितच्या मित्रांनी त्याच्या घरी अपघात झाल्याचे कळवले अजितच्या नातेवाईकांनी ते महाराष्ट्र बाहेर राहत असल्याने त्यांनी पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. 

        पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सचिन शिंदे, ईश्वर काळे, नवनाथ शिंदे, सिध्देश पाटील ,गौमत लोकरे,नरेश येमुल, गणेश साळूंके, आकाश पाटील,साईल शेख या पोलिसासह मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, आपत्ती व्यवस्थापन समिती मुळशी आणि माणगाव रेक्सुव रायगड टिमचे शेलार मामा, प्रशांत शेलार, मजित शेख, राजू प्रधान, गणेश निवेकर पुलिस पाटील निवे, अमोल शिंदे, शंकर, समीर बामगुडे, शरद बहिरट, शशिकांत चोरघे,सहिल गव्हाने, गणेश बामगुडे विलास भंडारी अभिषेक भोसले, किरण वाळे, सार्थक मुजानी, फराण शेख, सुरज झेंडे, विक्रम मोहिते, धैर्यशील जगदाळे, यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला.

add image
add image

Leave Comments

Top