पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांची आज पौड पोलिस स्टेशन येथून नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली असून पौड पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी मनोजकुमार माधवराव यादव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
अशोक धुमाळ यांनी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पौड पोलिस स्टेशनची सूञे हाती घेतली होती. गेली ४५ महिने मुळशी तालुक्यात काम करत असताना त्यांनी मुळशी पँटर्न मोडीत काढत गँगवार रोखण्याचे काम करत याकाळात गँगवारमधून गुन्हा घडला नाही. तसेच कोरोना काळ, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक,अनेक संवेदनशील ग्रामपंचायत निवडणूक, राष्ट्रपती,पंतप्रधान यांच्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले होते.मुळशीत अनेक सराईत गून्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली होती. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे जनतेशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. शहरी भागात खून करून मुळशी तालुक्याच्या डोंगराळ भागात आणून टाकणारे मृतदेहासंबधीतील सर्व गुन्हेही याकाळात उघडकीस आणले आहेत.