logo
add image
add image
Blog single photo

बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट चोरून विकणारी टोळी पौड पोलिसांकडून गजाआड


पिरंगुट : भुगाव - भूकूम परिसरातील बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट चोरून विकणारी टोळी पौड पोलिसांनी गजाआड केली आहे. याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरामधून किरण शाम नवाळे (वय २७),सुरज दत्तात्रेय ननावरे (वय २६), दोघेही राहणार.(साक्षी अपार्टमेंट, फ्लॅट नं ५०५, भुकूम ता. मुळशी जि. पुणे.) जयश मोहन सागरे (वय२७, चाळ नंबर ९ मोरे महाविद्यालय जवळ,कोथरूड-४), स्वप्निल शंकर भोंगळे (वय २५ रा. चाळ नंबर- ६,मोरे विद्यालयाजवळ कोथरूड पुणे) या चौघांनी रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत त्या ठिकाणहून सेंट्रींग प्लेट चोरून त्या पिंपरी चिंचवड हद्दीतील दापोडी परिसरातील मोसिम सुलतान खान (रा दापोडी ) याला विकला होता. या गुन्ह्यातील चोरलेल्या सेंट्रींग प्लेटा तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा एकूण २,४०,०००/-  रुपयांचा मुद्देमाल पौड पोलिसांनी जप्त केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिक तुकाराम दिघे यांनी पौड पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

   उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिता रवळेकर, पोलीस नाईक सिद्धेश पाटील, पोलीस शिपाई अक्षय नलावडे, पोलीस हवालदार हरिश्चंद्रे यांनी हा तपास लावला आहे.

add image
add image

Leave Comments

Top