पौड : अबंडवेट ( ता.मुळशी ) येथे नदीलगत असलेल्या भुमकर वस्ती येथे राञीच्या वेळी एका घरातील लोखंडी कपाटातील लॉकर अज्ञात व्यक्तीने तोडुन त्यामध्ये ठेवलेले ११,८३००० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यानी चोरून नेण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पदमा हनुमंत भुमकर ( वय ५३ वर्ष) यांनी पौड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भुमकर परिवार भाऊबीजेनिमित्त बाहेरगावी गेलेला होता.याच संधीचा फायदा घेत २६ आँक्टोबर सायंकाळी ४ ते २८ आँक्टोबर सकाळी ९.१५ वा अबंडवेट येथील भुमकरवस्ती येथील पद्मा भुमकर यांच्या बंद घराचे कडी कोयंडा तोडुन आत प्रवेष करून घरामधील बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाटातील लॉकर तोडुन त्यामध्ये ठेवलेले ११,८३००० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले आहेत.तसेच कपाटातील महत्वाचे कागदपत्रेही चोरून नेलेली आहे.सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत