logo
add image
add image
Blog single photo

भुगाव-भुकूम परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टोळक्याचा एकावर खुनी हल्ला.


पिरंगुट : भुगाव- भुकूम  परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टोळक्याचा व्यावसायिकावर खुनी हल्ला केला असून यामध्ये शंतनु सुनील आंग्रे (वय २४ वर्षे, आंग्रेवाडी रा.भूकूम.ता. मुळशी जि. पुणे) हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

          पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळक्याने आम्ही येथील भाई आहोत तुला अजून माहिती नाही का असा दम देऊन त्यांच्या भावाला घेण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले आंग्रे यांना लोखंडी फायटरने जखमी करून खाली पाडले आणि खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड घालणार होते तेवढ्यात एका महिलेने आरोपीला ढकलले. यामध्ये शंतनु आंग्रे थोडक्यात वाचले. याप्रकरणी  राकेश सुरेश वाघ , सतीश करगुले (पूर्ण नाव माहित नाही) , विकी लोयरे (पूर्ण नाव माहित नाही) , अभिषेक काळवीट (पूर्ण नाव माहित नाही) ,गट्टे मारणे (पूर्ण नाव माहित नाही) , अक्षय साठे (पूर्ण नाव माहित नाही) आणि अभिषेक पिलाणे (पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. माताळवाडी फाटा ता. मुळशी जि.पुणे ) यांच्यावर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून सर्व आरोपी फरारी आहेत. 

           यासंदर्भात भुगांव - भुकूम या दोन्ही गावांतील नागरिकांनी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांची भेट घेऊन या सर्व दहशत माजविणाऱ्या टोळक्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदन दिले. तसेच दोन्ही गावांनी एकत्र येऊन परिसरामध्ये तयार होत असलेली संघटित गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचे आज भुगाव येथील बैठकीमध्ये ठरवले आहे. गुन्हेगार जसे संघटित होतात तसेच आपणही संघटित होऊन गुन्हेगारी या ठिकाणी होऊच द्यायची नाही असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड करत आहेत.


add image
add image

Leave Comments

Top