logo
add image
add image
Blog single photo

भुकूम येथील दिपक वाईन्सचे शटर उचकटून चोरी.


पिरंगुट : भुकूम ( ता.मुळशी ) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले दिपक वाईन्स येथे दुकान राञी चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, भुकूम येथे सेल पेट्रोल पंपाजवळ असलेले दिपक वाईन्स हे दुकान ( १९ आँक्टोबर ) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यानी शटर तोडल्याचे सीसीटीव्ही कँमेरात कैद झालेले असून चोरट्यांनी पंचवीस ते तीस हजार रूपयांची रक्कम चोरून नेली आहे.पौड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड यांनी घटना स्थळावर येऊन पाहणी केली.

       भुगांव - भुकूम परिसरात मुख्य रस्त्याला लागूनच अनेक दुकाने आहे. पोलिसांची गस्त राञीच या भागात असते. माञ मागील महिन्यात शटर उचकटून चोरी करण्याच्या तीन घटना मागील महिन्यात घडल्या आहेत.

add image
add image

Leave Comments

Top