logo
add image
add image
Blog single photo

घोटावडे येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली : तीन जणांना अटक


पौड : घोटावडे ( मुळशी ) येथे बापुजीबुवा मंदिराच्या  अलीकडे रस्त्याच्या कडेला एक अनोळखी पुरुषाच्या कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहासंबंधी खुनाची उकल करण्यात तसेच काही तासाच्या आत आरोपीना  जेरबंद करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता एक अनोळखी पुरुषा प्रेत, चेहरा, हात, पायाची बोटे जंगली प्राण्यांनी खाल्याने ओळख पटत नव्हती.पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी हिंजवडी, वाकड, भोसरी पोलीस ठाणे तसेच पिंपरी, पुणे शहर भागात या वर्णनाचे हरवल्याची तक्रार दाखल आहे का, या अनुशंगाने मयताचा शोध घेणेकामी वेगळ्या टिम तयार करून रवाना केल्या असता.सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, सहाय्यक फौजदार नाना शेंडगे, पोलिस हवालदार रॉकी देवकाते, पोलिस कॉन्स्टेबल साहिल शेख यांना मयताचे अंगावरील कपडयाचे वर्णन व उजव्या हाताचे पोटरीवरील असलेल्या टॅटु या वर्णनावरून भोसरी पोलीस ठाणेत दाखल असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक यांना बोलावुन मयताचे फोटो, कपडयाचे फोटो, टॅटु दाखवले असता त्यांनी सदर इसम हा प्रशांत आनंदा डोळस ( रा. डोळसवस्ती अशोकनगर भोसरी )  हा असल्याचे सांगितलेने मयताची ओळख पटविण्यात आली. 

           पौड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एकाच नंबरवरून मयत इसमास ४ फोन आले असल्याचे व त्यानंतर मयताचा मोबाईल बंद झाल्याचे दिसत आल्याने शेवटचे कॉल असणारे नंबरचे नाव पत्ता माहिती घेतली असता सदर व्यक्ती शेखर तात्याराम पाटोळे ( रा. विठठलनगर लांडेवाडी भोसरी)  याचे नाव निष्पन्न झाल्याने  याला ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता शेखर  याने सांगितले कि माझी मेव्हणी हिचेशी मयत प्रशांत आनंदा डोळस याचे अनैतिक संबंध होते व मी आणि मयत ज्या ठिकाणी कामास होतो तेथुन मयत प्रशांत डोळस याचे सांगणेवरून मला कामावरून काढुन टाकले याचे संशयावरून मी प्रशांत आनंदा डोळस यास दारूची पार्टी करू असे सांगुन बोलावुन घेवुन माझे साथीदार लखन वाघमारे, बाबा, पुर्ण नाव माहित नाही असे  रिक्षात बसुन हिंजवाडी मार्गे बापुजीबुवा मंदीराचे पुढे गोंडाबेवाडी ( ता. मुळशी) भागात प्रशांत डोळस यास त्याचा आणुन गळा

आवळुन खुन करून मयतास रोडचे कडेला चारीत टाकुन दिले वगैरे खुनाचे गुन्हयाची शिताफीने उकल केली. बाबत मयताचे नातेवाईक भाऊ प्रविण आनंदा डोळस ( रा. अशोकनगर भोसरी) यांनी फिर्याद दिली. गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस विनायक देवकर  हे करीत आहेत.

        याप्रकरणी १) शेखर तात्याराम पाटोळे ( वय ३३ रा. विठठलनगर लांडेवाडी भोसरी  २) लखन भास्कर वाघमारे (वय २९, रा. गोकुळनगर पठार वारजे )३) दत्ता उर्फ बाबा चत्रभुज शिनगारे ( वय २७ रा. आंबेडकरनगर लांडेवाडी भोसरी ) यांना अटक केली आहे. 

          सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मितेश घटटे,  उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नाना शेंडगे, पोलिस हवालदार नितीन रावते,  संदिप सपकाळ, रॉकी देवकाते, पोलिस नाईक विराज कामठे,प्रशांत बुणगे,सिध्देश पाटील, आबा सोनवणे, पोलिस काँन्स्टेबल सागर नामदास, साहिल शेख या पथकाने केली. गुन्हयाचे तांत्रीक तपासात सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे पोलिस नाईक सुनिल कोळी, पोलिस काँन्स्टेबल चेतन पाटील याचे विशेष योगदान मिळाले.तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख प्रमोद बलकवडे व त्याची सहकारी टिम याचे विशेष सहकार्य मिळाले.

add image
add image

Leave Comments

Top