logo
add image
add image
Blog single photo

दासवे चोरी प्रकरणातील आरोपीला अटक : पौड पोलिसांची कामगिरी


पौड : दासवे ( ता.मुळशी ) येथे घरफोडी व चोरी करणाऱ्या  आरोपीला पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ७ तोळे सोने व ३२ हजार रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

         याप्रकणी पौड पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत सुरेश कोंडीबा मरगळे यास अटक केली व २ घरफोडीचे व १ चोरीचा असे ३ गुन्ह्यांचा छडा लावला. आरोपीविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासवे (ता. मुळशी) येथे मागील काही दिवसांपूर्वी २ घरफोडीचे व १ चोरीचा असे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान पौड पोलिसांपुढे होते. त्यानुसार कौशल्यपूर्वक तपास करत आरोपीचा मागमूस काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मरगळे याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ७ तोळे सोने व ३२ हजार रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

         सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस अंमलदार नागटिळक, पोलिस हवालादार आनंदा बाठे, पोलिस नाईक सिद्धेश पाटील, पोलिस नाईक संतोष कालेकर यांच्या पथकाने केली.

add image
add image

Leave Comments

Top