logo
add image
add image
Blog single photo

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पौडमध्ये कारवाई


पौड : पौडमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लावण्यात आलेल्या ६३ वाहनांवर  कारवाई करुन ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे. 

         पौड बसस्थानक ते हाँटेल चिन्मय दरम्यान आपल्या कामासाठी पौड येणारे नागरिक आपली चारचाकी वाहने कोठेही उभी करून जात असतात. यामुळे पौडमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते. यावर पर्याय म्हणून आज पोलिसांनी या वाहनावर कारवाई करण्यास सुरूवात केली.

          नो पार्किंगमध्ये पहिल्यांदा कारवाई झाल्यास ५०० रुपये दंड,  दुसऱ्या कारवाई करता १५०० रुपये दंड, तिसऱ्या कारवाई करतात ३००० रुपये दंड अशाप्रमाणे दंडामध्ये वाढ होत जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपली वाहने योग्य रीत्या पार्किंग करावीत. जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही व आपल्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही. याकरता वहान पार्किंग करता योग्यती दक्षता घ्यावी. असे आवाहन पौड पोलिसांनी केले आहे.

      हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस नाईक पंढरीनाथ कामठे, पोलीस नाईक अर्जुन व पोलीस अमलदार राजेश गायकवाड यांनी केली.

add image
add image

Leave Comments

Top