पौड : वाशिम जिल्ह्यातील ६ तरुण पर्यटनासाठी आले असताना ताम्हिणी घाटात त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन कार खोल दरीत कोसळली.हि घटना शनिवार ( दि.२०) सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.यावेळी सदर कार ही दरीत पलट्या खात दरीच्या मधोमध अडकली.यातील तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून तीघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहन गाडे ( वय २६ वर्ष), ऋषभ चव्हाण ( वय २४ वर्ष) , सौरभ गुघे ( वय २५ वर्ष), कृष्ण राठोड (वय २७ वर्ष), प्रवीण सरकटे (वय २६ वर्ष ) आणि रोशन चव्हाण ( वय २२ वर्ष) सर्व राहणार मंगळूर जिल्हा वाशिम हे त्यांच्याकडील स्विफ्ट गाडी सह पुण्यावरून देवकुंड येथे येत असताना सायंकाळी चारच्या वाजण्याच्या दरम्यान कोंडेधर सणसवाडी गावचे हद्दीमध्ये ड्रायव्हरने ब्रेक मारला असता गाडी चिखलामध्ये स्लीप होऊन अपघात झाला आहे
याबाबतची माहिती पोलिसांसह रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थेतील साळुंके रेस्क्यू टिमला माहिती पडल्यानंतर तात्काळ या टिमचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वीफ्ट कार मधून ६ पर्यटकांपैकी जखमी अवस्थेतील ३ पर्यटकांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. तर दुर्दैवाने या कारमधील अन्य तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला होता.जखमींना साळुंके टिमच्या सदस्यांनी दरीतून खालच्या बाजूला उतरविले. मयत पर्यटकांमध्ये ऋषभ चव्हाण, सौरभ गुघे आणि कृष्णा राठोड यांचा समावेश असून या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण असे सर्व वाशिम जिल्ह्यातील राहणारे आहेत.जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Prakash zore
Good wark