पौड : मावळ तालुक्यातील कोथर्णे गावातील मंगळवारी बेपत्ता झालेल्या सातवर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवार (दि. ३) सकाळी आढळला. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला जेरबंद केले. माञ या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता पौड ( ता.मुळशी ) येथे मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर देण्यात आलेले निवेदन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आणि तहसिलदार कार्यालयाच्या वतीने छाया सानप यांनी स्वीकारले.
तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यत अनेक मोर्चे काढले. माञ आज व्यापारी संघ पौड, पौड ग्रामपंचायत आणि पौड ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात पौड हायस्कूलच्या विद्यार्थीनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नराधमाने लहान बालिकेवर केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे.त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.वेगवान निकाल लागला पाहिजे.अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.यावेळी पौडच्या प्रभारी सरपंच मोनाली ढोरे, माजी सभापती उज्वला पिंगळे,युवासेना संघटक संकेत दळवी, व्यापारी संघाचे संस्थापक विशाल राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, अजय कडू, प्रशांत वाल्हेकर, प्रीती आगनेन, रसिक जोशी, नंदा नवले, पोलिस पाटील संजय पिंगळे,भाजपाचे उत्तमचंद आगरवाल, श्री छञपती शिवाजी विद्यालय पौडचे मुख्यध्यापक संतोष भोकरे, अनिल काळभोर, एस.पी.पाटील, सागर ढोरे,बाळासाहेब इप्ते,शुभम भोसले, रोहित उबाळे,महिंद्र उबाळे,राजेंद्र ओंबळे,इम्रान मुलाणी,संजय गुरव, दशरथ चव्हाण,संदीप शेडगे, निखील रूकर,शामराव नवले,रोहित कुंभार, कैलास पवार,धनशाम उबाळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Poonam Gajare
Need your contact number to publish news