logo
add image
add image
Blog single photo

वाघवाडी येथील वाघ पाटील वस्तीत जमिनीना भेगा


मुळशी : मुळशी तालुक्यातील वडगाव- वाघवाडी येथील वाघ पाटील वस्ती येथे डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीला भेगा पडलेल्या असून येथील सर्व घरे धोकादायक स्थितीत आलेले असून काही घराची पडझड सुरू झाली आहे.तर येथील सिमेंट रस्त्यांना तडे गेलेले असून घराची पडझड होण्याची शक्यता बळावली आहे.

       मुळशी धरणभागात धरणाचे पाणी व डोंगराच्या मधोमध वडगाव वाघवाडी हे गाव आहे.या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील घरामागील शेतजमिनीला भेगा पडलेल्या आहेत.येथील १८ कुटुंबे या पडलेल्या भेगामुळे भयग्रस्त झालेली असून यातील १६ नागरिक वाघवाडी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत इमारतीत आणून ठेवलेली आहे. या सर्व नागरिकांच्या जेवणाची व्यवस्या जागेवरच करण्यात आलेली आहे.गटविकास अधिकारी संदीप जठार, तलाठी संकेत आव्हाड,ग्रामसेवक विजय कुदळे यांनी भेगा पडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.

          यावेळी सरपंच अर्चना वाघ, सुभाष वाघ, लक्ष्मण वाघ, माजी पोलिस पाटील सुनील रसाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर वाघ, मारूती वाघ, नारायण वाघ, हिरामण वाघ, अमित वाघ उपस्थित होते.

 या पडलेल्या भेगा धोकादायक असून केव्हाही भुस्खलन होऊ शकते. पाऊसाचे दिवस असून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे टाटा कंपनी व शासनाच्या वतीने पक्की घराची व्यवस्था करण्याची मागणी येथील सरपंच अर्चना सुभाष वाघ यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top