मुळशी : माले ( ता.मुळशी ) येथे झालेल्या चारचाकी आणि दुचाकी अपघातात वळणे येथील दोन जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे.
माले येथील पाण्याच्या टाकी समोर शनिवार ( दि.१८) रोजी राञी आठ वाजता झालेल्या भयंकर अपघातात वळणे येथील सौरभ दत्तात्रय भोसले आणि कुणाल दिलीप भोसले ( दोघे रा. वळणे ता.मुळशी ) यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी स्वप्निल रमेश पळसकर, ( वय-२९ वर्ष रा. पळसे ता.मुळशी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वप्नील तुकाराम भोसले ( वय २४ वर्ष, रा. वळणे ता मुळशी ) यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल रमेश पळसकर हा पिकअप ( नं. MH 12 FD 3947) मधून मुळशीहुन पुण्याकडे भरधाव वेगात जात असताना रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने निश्काळजीपणे स्वतः गाडी चालवून समोरून येणाऱ्या पल्सर ( नं. MH 12 LY 1878 ) वरील सौरभ दत्तात्रय भोसले व कुणाल दिलीप भोसले यांना जोरदार धडक दिली.यात हे दोघेही गंभीर जखमी झाले.यात दोघांचाही मृत्यू झाला असून पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे हे तपास करीत आहेत.