logo
add image
add image
Blog single photo

खून प्रकरणातील ४ आरोपींना ४८ तासांत अटक


पौड : पौड पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचे गुन्ह्यांतील ४  आरोपीना ४८ तासात पौड पोलिसांनी गजाआड करत पौड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


        पौड पोलिस स्टेशन येथे मिलिंद दत्तात्रय शिवणकर ( वय 58 रा कोथरूड) हे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित तक्रारीवरून विक्रांत कांबळे यांच्या कडे चौकशी केली असता चौकशीत त्याने व त्याच्या साथीदाराने हरवलेल्या व्यक्तीचे अपहरणं करून त्याचा खून करून त्याचा मृतदेह अतवण  (ता. मावळ जि. पुणे ) गावच्या हद्दीत टाकून दिल्याची कबुली दिल्याने विक्रांत सुभाष कांबळे ( वय 22 वर्षे), पवन दत्ता हनवते (वय 22 वर्षे), इरफान सफीउल्ला खान (वय 23), प्रकाश बंडु कांबळे (वय 52वर्षे ) (सर्व रा. कासारआंबोली  ता. मुळशी) या आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

  सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक  मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक  देवकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  संतोष कुंभार, सहा.पोलीस ऊप निरीक्षक येमूल सहा.पोलीस उप निरीक्षक सचिन शिंदे,पोलीस हवालदार नागटिळक, पोलीस हवालदार सकपाळ, पोलीस हवालदार शेडगे, पोलीस नाईक राँकी देवकाते,पोलीस नाईक सिध्देश पाटील,अनिकेत सोनावणे,  काळे ,राजेश गायकवाड पोलीस काॅस्टेबल साहिल शेख पोलीस कॉन्स्टेबल सागर नामदास यानी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड  करीत आहोत.

add image
add image

Leave Comments

Top