भुगांव : भुगांव ( ता.मुळशी ) येथे जमिनीच्या वादातुन व रोजचे होणाऱ्या भांडणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करण्यात आला आहे.यामध्ये प्रितम राजेंद्र फाळके ( वय २५ वर्षे रा. स्वॉगबर्ड सोसायटी भुगाव ता. मुळशी ) याच्या डोक्यात दगडाने मारहाण व कोयत्याने गंभीर वार करून खुन केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी ऋतुराज हदयनाथ जाधव ( वय.३४, वर्षे,रा.करंजावणे वस्ती,भुगाव ता.मुळशी ) यांनी पौड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भुगाव (ता.मुळशी) हददीत स्वॉगबर्ड सोसायटीच्या वरील बाजुला फोर सिझन सोसायटीच्या पुढे गोठयाच्या शेडचे आत प्रितम फाळके हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.काळया रंगाचे जर्कीगला लागलेल्या रक्तावरून जर्कीग हे प्रितम फाळके याचेच असल्याचे फिर्यादीने ओळखले.तसेच रक्ताने माखलेला मोठा दगड,व काळया रंगाचे जर्कीग त्या शेजारी लोखंडी कोयता पडलेला दिसून आला. गोठ्यावर येत असताना फिर्यादीने चेतन उर्फ पांडया रोहिदास फाळके,अमीत उर्फ गुंडया चंद्रकांत फाळके, (दोघे रा. स्वॉगबर्ड सोसायटी भुगाव ता. मुळशी ) व त्यांचा मित्र शंकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांना दुचाकीवरून तेथुन पळुन जाताना पाहिले होते.या तिघांनीच मिळून प्रितम याचा खून केलेला आहे असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटलेले आहे.
घटनास्थळाला हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांनी भेट दिली.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करीत आहेत.