logo
add image
add image
Blog single photo

पौड, हवेली व वेल्हे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नऊ मशिदीमधील अजान लाऊड स्पीकर विना


पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली उपविभागातील एकूण नऊ मस्जिद मध्ये पहाटेची अजान लाऊड स्पीकर विना घेण्यात आली आहे. सर्व मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याची ग्वाही दिल्याची माहिती हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी दिली आहे. 

हवेली उपविभागात पौड, हवेली व वेल्हे या तीन पोलीस ठाण्यांची हद्द येते. यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पौड, पिरंगुट, घोटावडे व उरवडे अशा चार, हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला व डोणजे अशा दोन व वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेल्हे, साखर व कातवडी या तीन अशा एकूण नऊ मस्जिद आहेत.

या सर्व मस्जिद व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नियमांचे पालन करत हवेली उपविभागातील सर्व मस्जिद मध्ये पहाटेची अजान लाऊड स्पीकर विना घेण्यात आली आहे. तसेच इतर धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. 

"उपविभागातील सर्व मंदिर व मस्जिद व्यवस्थापकांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुर्वी आम्ही सामाजिक सलोखा टिकवून ठेवला आहे व यापुढेही टिकवून ठेवू अशी ग्वाही दिली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."

- भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण



खुप वर्षांपासुन आम्ही हिंदू मुस्लिम व इतर धार्मिक सामाजिक सलोखा टिकवुन राहत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही आदर करतो.  पोलिस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

- मौलाना मोहोम्मद अशरफ शेख इमाम (पिरंगुट मशिद) 


add image
add image

Leave Comments

Top