logo
add image
add image
Blog single photo

घोटावडे येथील ४५ दुकानावर पीएमआरडीएची कारवाई


पौड :  घोटावडे (तालुका.मुळशी ) येथील हनुमान चौक ते शेळकेवाडी दरम्यान गट नंबर १८१,२६१ व १७२ या ठिकाणी पीएमआरडीए च्या अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत ४५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.

       यामध्ये वाणिज्य स्वरूपाचे  सुमारे ८२५० स्क्वेअर फुटाचे ३० गाळे,५००० स्क्वेअर फुटाचे ६ गाळे ३२०० स्क्वेअर फुटाचे ५ गाळे, १७६० स्क्वेअर फुटाचे ४ गाळे अशी एकुन १८२१० स्क्वेयर फुट क्षेत्रा मधे एकून ४५ अनाधिकृत वाणिज्य गाळे निष्कासित करून कारवाई करण्यात आली. पोकलेनच्या साह्याने सदर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आले

         सदर कारवाई करते वेळी पीएमआरडी चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त  तैनात करण्यात आला होता.अनाधिकृत बांधकामे निष्कासित करनेसाठी स्वतः बांधकाम धारकानी आपली बांधकामें काढून घेऊन प्रशासनास सहकार्य केले.

           पीएमआरडीए च्या अधिकाऱ्यांमार्फत बांधकाम  धारकांना परवानगीशिवाय  कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारच्या पत्र्याच्या शेडच्या  बांधकामाचा सुळसुळाट झालेला असुन सर्वच जागी अशी बांधकामे निष्कासित करण्याची मोहिम  राबविन्यात येत आहे, तसेच वरील सर्व अनधिकृत बांधकाम  धारकांकडून  अनधिकृत बांधकाम   निष्कासन खर्च  वसूल  केला  जाईल असे  ही  सांगण्यात  आले आहे.

add image
add image

Leave Comments

Top