logo
add image
add image
Blog single photo

पौड पोलीसाचे भरे येथे मॉक ड्रिल


पौड : भरे येथील मोकळ्या मैदानावर फायर ब्रिगेड वाहनातुन पाण्याचा वर्षाव करून लाठी चार्ज तसेच बेकायदेशीर जमाव पांगविण्यासाठी ५ अश्रुधुर कांडयाचा होत असलेला वापर पाहून नागरिकांना काय झाले हे समजले नाही ,परंतु कोणती तरी दुर्घटना झाले असलेचे नागरिकांमध्ये चर्चा होत असताना नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन माहिती देण्यात आली की हा एक जातीय दंगा काबु योजना( मॉक ड्रिल ) चा भाग आहे.तसेच आगामी रमजान ईद सणाच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा घोटावडे, पौड, उरावडे व पिरंगुट गावामध्ये तसेच मस्जिद परिसरात रुट मार्च घेण्यात आला आहे


           पौड  पोलिस स्टेशन हद्दीतील भरे गाव येथील भरे विद्यालया शेजारील मोकळ्या ग्राउंडवर दोन गटामध्ये वाद होऊन तणाव निर्माण झालेला आहे असे पुणे कंट्रोल रूमला कळविण्यात आले पुणे कंट्रोल रूम कडून पौड पोलीस  स्टेशनला माहिती मिळताच सदर घटनेचे ठिकाणी  पौड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ पोहचले व परिस्थिती नियंत्रणाखाली येत नसल्यामुळे हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांना माहिती कळवून हवेली डिव्हिजन मधून तात्काळ मदत मागविण्यात असता हवेली पोलीस स्टेशनचे १ अधिकारी व पोलीस अंमलदार १० व वेल्हा पोलीस स्टेशनचे ८ पोलीस अंमलदार ,मुळशी आपत्ती व्यवस्थापनची रुग्णवाहिका तसेच  फायर ब्रिगेड वाहन घटनास्थळी बोलावण्यात आले.

          सर्व पोलीस व शासकीय यंत्रणा जात असलेचे पाहुन नागरिकांना काय झाले हे समजले नाही ,परंतु कोणतीतरी दुर्घटना झाले असलेचे लाकांमध्ये चर्चा होत असताना सर्व घटनेबाबत  लोकांमध्ये / नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत असताना  नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन माहिती देण्यात आली की हा एक जातीय दंगा काबु योजना / मॉक ड्रिल चा भाग होता 

         मात्र या सर्व घटनाक्रमातुन कसल्याही आपत्ती काळात कोणत्याही बिकट परिस्थितीला तोंड देण्यास पोलीस दल सज्ज असल्याचे या मॉकड्रिल मधुन दाखवुन देण्यात आल्याचे हवेली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले .

add image
add image

Leave Comments

Top