logo
add image
add image
Blog single photo

पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस


पौड : पौड पोलिस स्टेशन सन २०२०-२०२१ मध्ये चोरी झालेले ट्रँक्टर व टेम्पो सांगोला येथून ताब्यात घेण्यात आलेले असून या प्रकरणी विजय महादेव कराळे ( वय.२१ वर्ष, रा.माडयाळ,ता.जत,जि.सांगली ) याला अटक करून सदर चोरीला गेलेल्या गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. 

          पौड पोलिस स्टेशन येथील चोरीला गेलेला ट्रँक्टर व टेम्पो हे सांगोला येथे असल्याची माहिती खाजगी बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना मिळाली.तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावून छडा लावला आहे.

         सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डाँ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार इनामदार,पोलिस हवालदार जगदाळे, पोलिस नाईक पाटील, पोलिस नाईक कालेकर यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top