logo
add image
add image
Blog single photo

पौडमध्ये चोरी : साडेपाच तोळ्याचे गंठण चोरीला


पौड : पौड ( ता.मुळशी ) येथे भरवस्तीत असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले साडेपाच तोळ्याचे गंठण चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

       या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड येथील मागील आळी येथे सनी अशोक वाचकवडे ( वय.३४, रा.पौड) यांचे घर आहे. सनी, त्यांची आई व पत्नी हे कामा निमित्त बाहेर गेलेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी राञीच्या वेळी येऊन दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाट या चोरट्यानी तोडून कपाटातील सामान फेकून दिले. कपाटात असलेले साडेपाच तोळ्याचे गंठण चोराच्या हाताला लागले. तसेच कपाटातील अजूनही काही वस्तू चोरीला गेल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पौड येथे भरवस्तीत असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातून चोरी झाल्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड आणि पोलिस हवालदार संदीप सकपाळ हे करीत आहेत.

add image
add image

Leave Comments

Top