पिरंगूट : पिरंगूट घाटात कंटेनरने काही दुचाकीना उडविलेले असून यात एक जण मयत तर तीन ते चार जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून हा कंटेनर काही चारचाकीना देखील घासून जाऊन पलटी झाला आहे. लवळे फाटा येथून घाटात जिथे सिमेंटचा रस्ता सुरू होतो तिथे हा अपघात झालेला आहे.
काल ( दि.२१) रोजी अँम्ब्रोसिया हाँटेल येथील वळणावर झालेल्या अपघातात एक जणाला आपले जीव गमवावे लागले असून आजही झालेल्या अपघातात काही निष्पाप नागरिकांचे बळी गेले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
अजून किती दिवस चालणार हे
चांदणी चौकशते आदरवाडी रस्त्याचे गेली चार वर्ष काम सुरू असून पिरंगूट येथे गेली दिड महिने हे काम बंद पडलेले आहे. अनेक जणांनी मागणी व प्रयत्न करूनही या रस्त्याचे काम सुरू होत नाही. पिरंगूट घाट,धनवेवाडी ते पौड, सुतारवाडी ते कासारआंबोली दरम्यान एक बाजू करून रस्त्याची दुसरी बाजू तशीच सोडून देण्यात आलेली आहे.तर काही ठिकाणी पूल बांधण्याचेही काम रेंगाळत चललेले आहे.मंञी, खासदार, आमदार यांनी विविध विकासकामांचे उदघाटनाकरता तालुक्यात दौरे केले माञ मुळशीच्या सोयीच्या असलेल्या मुख्य रस्त्याला कोणच वाली नसून दिवसेंदिवस या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरू लागले असून अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्य मुळशीरांना पडला आहे.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल का करू नये
चांदणी चौक ते आदरवाडी दरम्यान दररोज अपघात होत असून निष्पाप नागरिकांना यात आपला जीव गमवावा लागत आहे. गेली चार वर्ष अर्धवट राहिलेल्या कामाला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी मुळशी तालुक्यातून होऊ लागली आहे.
Mohini
Khup vait paristiti hote ahe....laksh ghalun rastayche kaam zalech pahije...nishpaap jeevacha vichar kara....