logo
add image
add image
Blog single photo

खांबोली येथे शाँक लागून दोन कामगारांचा मृत्यू


घोटावडे : खांबोली ( ता.मुळशी ) येथे बांधकाम करीत असताना दोन कामगारांचा हायव्होल्टेज तारांचा शाँक लागून मृत्यू झाला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १) सुनिल विश्वनाथ चौहाण ( वय ३५ वर्ष ),२ ) सुभाष फुलचंद चौहाण ( वय ४० वर्ष,दोघे - राहणार थेरगाव, ता.मुळशी, जि.पुणे ) यांचा मृत्यू झाला असून पवन मधुकर चौधरी ( वय ३६ वर्ष ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

        पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खांबोली येथे जमिन गट नंबर ८७/४ येथे कामगारांना बांधकाम करण्याचे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता बांधकामाची ग्रामपंचायतीची परवानगी न घेता तसेच बांधकाम साईड शेजारील असलेल्या इलेक्ट्रिक तारेचा शॉक बसून मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही कामगारांना काम करायला लावून ते काम चालू ठेवून त्यामध्ये बांधकाम साईटवर काम करणारे कामगार १) सुनिल विश्वनाथ चौहाण ( वय ३५ वर्ष) २) सुभाष फुलचंद चौहाण ( वय ४० वर्ष दोघे राहणार थेरगाव ता मुळशी जि पुणे ) यांचे मृत्यूस १ )ठेकेदार सुरेश गंगाराम खानेकर ( रा. ताथवडे,ता.मुळशी,जि पुणे), २ ) बांधकाम मालक गणेश मुरलीधर फडके ( वय ४२ वर्ष, रा.रहाटणी पिंपळे सौदागर, ता.हवेली,जि.पुणे) हे कारणीभूत ठरले असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ  पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे करीत आहेत.

add image
add image

Leave Comments

Top