पौड : प्रसिद्धी अभिनेत्री किशोरी शहाणे - वीज यांच्या गाडीला मुळशी तालुक्यातील हाडशी येथे अपघात झाला आहे.किशोरी शहाणे या मुंबईहून मुळशी तालुक्यातील गिरीवन येथे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने अपघात झाला असून कोणालाही यात दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती किशोरी शहाणे यांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.यावेळी त्यांच्या समवेत त्याचे पती निर्माते - दिग्दर्शक दिपक वीज हे सुध्दा होते.
किशोरी शहाणे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” असं त्यांनी म्हटलं आहे.