logo
add image
add image
Blog single photo

भुगाव येथील जलाशयात बुडालेल्याचा मृतदेह ९५ तासांनी सापडला.


भुगांव : भुगाव येथे असलेल्या श्री छञपती शिवाजी जलाशयामध्ये बुडालेल्या दत्तात्रेय मोतीराम मिसाळ (   वय अंदाजे ३८ रा, शिवाजी नगर पुणे) याचा मृतदेह ९५ तासांनी शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना यश आले आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ( दि.१७) रोजी भुगाव येथील श्री छञपती शिवाजी जलाशयाच्या कडेला मनोज भीमराव नगरकर ( वय ५० रा गोखले नगर, पुणे),महेश नागनाथ अवघडे ( वय २८, रा. शेलार कॉम्प्लेक्स पौड रोड), योगेश सुरेश गुणवंत ( वय ४२, रा.गोखलेनगर) आणि दत्तात्रेय मोतीराम मिसाळ (वय अंदाजे ३८ रा.शिवाजी नगर पुणे ) हे चौघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. यातील दत्ताञेय मिसाळ हा फोटोसेशन करण्यासाठी पाण्यात उतरला. त्याचा पाय एका ठिकाणी घसरल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मिञानी १०० नंबरवर फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. 

          यानंतर पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने त्याचा शोध घेतला.चार दिवस शोध घेऊनही दत्ताञेयचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर गुरूवार ( दि.२०) सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे व त्यांच्या पथकाने दत्ताञेय याचा मृतदेह शोधून काढला.सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.गेली चार दिवस मृतदेह शोधकामी पोलिस हवालदार अनिता रवळेकर,निवास जगदाळे, भुकूमचे पोलिस पाटील सतीश गुजर यांनी मदत केली.या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार अनिता रवळेकर या करीत आहेत.

   

add image
add image

Leave Comments

Top